Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाज प्रबोधन कार्यक्रमात आदिवासी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न

आदिवासी माना जमात संघटन चंदनखेडाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

                  तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहनकालीन सांस्कृतिक नगरी चंदनखेडा येथील आदिवासी माना जमात समाज संघटन चंदनखेडा येथील राजमाता माणिका क्लब ग्राऊंड च्या प्रांगणात दिनांक ३ व ४ फेब्रुवारी दोन दिवसीय समाज प्रबोधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सकाळी परिसर स्वच्छतेने सुरुवात करुन नंतर समाज संस्कृती परंपरे नुसार मुठपुजा व डायका पार पडल्या व दुपारच्या सत्रात समाज प्रबोधन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या जसे की क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता माणिका, बाबुराव शेडमाके, भास्कर वाकडे, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

अध्यक्षस्थानी नयन बाबाराव जांभुळे सरपंच होते. तर प्रमुख मार्गदर्शक मयुर हनवते, गायत्री श्रीरामे, जेष्ठ नागरिक उत्तम झाडे, वैशाली दडमल,आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चंदनखेडा परिसरातील १० वी १२ आणि एकलव्य परिक्षेत उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार व गुणगौरव सुद्धा करण्यात आला.

  व समाज प्रबोधन कार्यक्रमानंतर महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या व सायंकाळी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला व दुसरा दिवसी ४ रविवार ला सकाळी ६ वाजता परिसर स्वच्छता करून सकाळी ८ वाजेपासून गावातुन जयघोषाच्या गजरात प्रतिमेचे मिरवणूक व नवरदेव चिरंजीव दशरथ छबुताई रामाजी दडमल चंदनखेडा यांचा सुद्धा आदिवासी पारंपरिक पद्धतीने बैलबंडी वर लग्न स्थळी मिरवणूकेतुन नेण्यात आले. व दुपारला २ वाजता भद्रावती तालुक्यातील विलोडा येथील सुनंदातताई रामाजी परसराम कोल्हे यांची व्दितीय कन्या सिमा यांचा भद्रावती. तालुक्यातील चंदनखेडा येथील दशरथ रामाजी दडमल यांचा विवाह अतिशय साध्या आदिवासी पारंपरिक पद्धतीने व मुलनिवासी आदिवासी महासभेच्या विचार धारणेप्रमाणे संप्पन झाला.

लग्नासाठी कोणताही मुहूर्त पाहण्यात आला नाही.मागील ४ वर्षापासुन आदिवासी माना जमात संघटन चंदनखेडा द्वारा समज प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, रुढी, परंपरा जतन व संवर्धन करण्याच काम आदिवासी माना जमात संघटन चंदनखेडा करिता आहे.थोर महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून त्यांनी मानवाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची आठवण करित आदिवासी पाटा म्हणजेच आदिवासी गीतांच्या माध्यमातून सहजीवनाची सुरुवात केली. लग्न मंडपात नेहमीच कानी पडणारी चित्रपटातील गाणी आणि डी.जे.चा कर्णकर्कश आवाज या गोष्टीना फाटा देत समाज जागृती करणारे गीत गाऊन,अक्षदा न वापरता पाहुणे मंडळींकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला.या लग्नाला सात्विकता, आध्यात्मिकता व सामाजिक जाणिवेची सद्भावनेची किनार होती. ४ फेब्रुवारी २०२४ ला विवाह सोहळा तालुक्यातील चंदनखेडा येथील राजमाता माणिका क्लब ग्राऊंड वर नुकताच पार पडला.

लग्नात श्रीमंतीचा बडे जाव , पैशाचा नाहक अपव्यय व थाटमाट नव्हता. यावेळी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा सत्कार केला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सुत्रसंचालन देविदास चौखे यांनी केले.व प्रास्ताविक विठ्ठलजी हनवते माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक यांनी केले. तर आभार प्रणय दोहतरे यांनी मानले.कार्यक्रमाला आदिवासी समाजातील बंधू- भगीनी, बालगोपाल,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष बालगोपाल, गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये