महाराष्ट्र

भारतीय सैन्य दलाच्या वतीने “शौर्य संध्या” चे आयोजन

चांदा ब्लास्ट:

उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्राच्या मुख्यालया तर्फे (उमंग) द्वारा दिनांक 2 फरवरी ते 4 फरवरी 2024 दरम्यान आयोजित केलेला हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर स्टेडियम, नागपूर येथे पार पडला.

उद्घाटन दिनी सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, लष्कर प्रमुख, जनरल, मनोज पांडे तसेच अर्चना पांडे उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, मेजर जनरल, योगेश चौधरी, ब्रिगेडियर, के. आनंद, ग्रुप कॅप्टन, रत्नाकर सिंग सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोबतच सैन्य दलात वापरण्यात येणारे जुने तसेच अत्याधुनिक शस्त्र प्रदर्शन सुद्धा भरविण्यात आले होते. ज्यामध्ये टँक गन सिस्टम, रॉकेट लॉन्चर, फ्लड रिलीफ, आणि इतर शस्त्रास्त्रे तसेच एनसीसी बद्दल माहिती केंद्र यांचे

सादरीकरण करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टीने झाली. घुडस्वारा द्वारे शस्त्राने झेंडे टिपल्या गेलेत. हेलिकॉप्टर मधून उतरून बंदी बनविणाऱ्याची सुटका व परत हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी रवानगी, डियर डेव्हिल्स द्वारा बुलेटवर कवायतीचा थरार, स्वान पथकांची शत्रूशी सामना करण्यास उपयोगी प्रात्यक्षिक, मलखांब, पंजाबी तसेच मद्रासी टीम द्वारा तलवारबाजी, सिंफनी बँड चे सादरीकरण, पॅरामोटर्स द्वारा पुष्पवृष्टी, स्काय डायव्हर्स द्वारा हेलिकॉप्टर वरून
उड्या घेऊन पॅराशुट द्वारा मैदानात उतरणे वगैरे सारख्या अनेक अशा थरारक सादरीकरणांचे प्रदर्शन बघून नागपूरकर एकदम थक्कच झाले होते. शेवटी ड्रोन द्वारा आकाशात शिवाजी महाराज, भारताचा नकाशा, गरुड सारख्या अनेक प्रतिकृती साकारल्या गेल्यात. सिंफनी बँड द्वारा देशभक्तीपर गीतानंतर राष्ट्रगीताने शौर्य संधेचा समारोप झाला. तदनंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रत्येक टीम लीडरशी हितगुज केल्यानंतर उपमुख्यमंत्री द्वारा सन्मानित माजी सैनिक, बिपिन कुमार मोघे, वर्धा. आणि वीरनारी तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये