ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वप्नील मेश्राम यांना साहित्य क्षेत्रातल्या कार्यासाठी चंद्रपूर रत्न पुरस्कार जाहिर

पार्थशर समाचारच्या तिसऱ्या वर्धापन दिनी ९ फेब्रुवारीला पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट

वर्ग आठवीत असताना निबंध स्पर्धेतल्या बक्षिसानी प्रेरणा दिली. त्या नंतर कविता लेखन सुरु झाले. गेल्या दहा – बारा वर्षांपासून साहित्य क्षेत्रात विविध साहित्य संमेलन, कविसंमेलनात विशेष सहभाग राहिला आहे.
स्वप्नील हा युवा कवी, साहित्यीक आहे. प्रसिद्ध विवीध वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात कविता, लेख आजवर प्रकाशित, झाले आहेत. कवी, ग्राफिक्स डिझाईनर, सुत्रसंचालक, निवेदक, युट्यूबर म्हणून त्यानी ओळख मिळवली आहे. ‘ स्पर्श हळव्या ओळींचा ‘ या इंस्टाग्राम पेज वर दीड लाखाच्या वर फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक इन्कम देखील प्राप्त करत असतो. सामाजिक कार्यात व विविध संस्थेत तो सक्रिय आहे.
सूर्यांश साहित्य व संस्कृतिक मंच या संस्थेने खरी ओळख मिळवून दिली. राज्यस्तरीय साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन अशा विविध संमेलनात संयोजक, कार्यकर्ता म्हणून भुमिका पार पडली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, वर्धा येथे कविकट्टा साठी कवितेची निवड करण्यात आली. विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखा चंद्रपूर या संस्थेत प्रसिद्धी प्रमूख म्हणून कार्यरत आहे.
साहित्यातल्या कार्याची दखल घेऊन विदर्भातील प्रसिद्ध पार्थशर समाचारच्या वतीने २०२४ या वर्षीचा चंद्रपूर रत्न हा पुरस्कार स्वप्नील मेश्राम यांना जाहीर जाहिर करण्यात आला आहे. याबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. जयश्री कापसे यांनी तसेच साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये