ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पंख्याक विकास मंचाव्दारे मुस्लीम समाजाच्या विदर्भस्तरीय उपवधु-उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन

तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या अभुतपुर्व मेळाव्याचा लाभ घ्यावा

चांदा ब्लास्ट

अल्पसंख्याक विकास मंच चंद्रपुर हि मुस्लीम समाजाच्या सर्वागिण विकासाकरीता कार्य करणारी संस्था असुन मागील १५ वर्षापासुन समाजात शैक्षणिक सामाजीक, आर्थिक प्रगतीकरीता कार्य करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आजकालच्या धकाधकीच्या जिवनात समाजात आपल्या मुला मुलीनां योग्य वर – वधु शोधणे कठीण झाले असुन याचाच एक भाग म्हणुन सदर प्रक्रिया सुलभ व्हावी पालकांना आपल्या पाल्यांकरीता जोडीदार शोधण्यासा सोईस्कर व्हावे या उदात्त हेतुने या मंगल प्रसंगी संस्थेचे योगदान तसेच सामाजीक बांधीलकी म्हणुन चंद्रपुर शहरात प्रथमच दिनांक २ व ३ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता पासुन रात्रौ १०.०० वाजे पर्यत कोहीनूर मैदान, दादमहल वार्ड, चंद्रपुर येथे मुस्लीम समाजातील विवाह योग्य मुला मुलीकरीता विदर्भस्तरीय भव्य मुस्लीम समाजाचा उपवर उपवधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याकरीता समाजातील विविध क्षेत्रातील गणमान्य उपस्थिती राहाणार असुन या मेळाव्यात समाजातील सर्व वयाचे अविवाहीत, घटस्पोटीत, विधवा मुला-मुलींनकरीता परिचय देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजातील प्रचलीत परदा पध्दतीनुसार सदर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असुन या ठीकाणी मुलांकरीता व मुलीनकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे या मेळाव्यात समाजातील होतकरू उच्च शिक्षीत, उच्च पदस्थ, तसेच समाजातील जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्याचा या प्रसंगी सत्कार करण्यात येईल त्याच प्रमाणे समाजातील महत्वपुर्ण योगदानाबददल अल्पसंख्याक विकास मंचाच्या वतीने या वर्षीपासुन समाजातील व्यक्तीना जिवनगौरव पुरस्कार देऊ गौरवण्यात येईल, कार्यक्रमाकरीता उपस्थित समाजबांधवाना राहण्याची व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या अभुतपुर्व मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आव्हाहन अल्पसंख्याक विकास मंचाच्या वतीने अध्यक्ष श्री मतीनजी शेख, बाबाभाई चमडेवाले, सलीम बेग, खालीक भाई, सैयद अतीकभाई, मुश्ताक खॉन, अ. बारीभाई, म. सादीक सर, अश्पाकभाई, रमजान खॉन सर, मुजावर अली भाई, डॉ. अनिस खॉन, राजु निसार भाई, ताहेरभाई अली, भुरू भाई, मुश्ताकभाई ( बेरींगवाले), अफरोज पठाण, शेरू भाई हन्फी, गफूरभाई सोनार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये