Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळावा संपन्न

५१० शैक्षणिक व बेरोजगार विद्यार्थ्यांची नोंदणी ; १५० हुन अधिक विद्यार्थ्यांना रोजगार होणार उपलब्ध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                   शैक्षणिक व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास व उद्योगजग मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर, श्री साई आय.टी.आय.भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी २०२४ ला भद्रावती येथील गुंडावर लॉन,भाजी मार्केट जवळ या रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा भद्रावती मध्ये पाहिल्यानदाकच झाला आहे.

जवळपास ५१० विद्यार्त्यानी या रोजगार मेळाव्यास नोंदणी केली. सदर मेळाव्यात आठ कंपन्यांचा सहभाग झाला होता. असून यात संन्सूर इंडिया प्रा. लि.चंद्रपूर, जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्विसेस प्रा. लि. चंद्रपूर, भारत पे प्रा .लि. चंद्रपूर एस.बी.आय लाइफ इन्शुरन्स कंपनी, चंद्रपूर, स्टार युनियन लाइफ इन्शुरन्स कंपनी, टॅलेंट सेतू प्रा.लि.पुणे, नवकीसान बायो प्लान्टेक लिमी.श्रीराम लायीफ, नवभारत फर्टीलायझर्स लिमिटेड आदी कंपन्यांचा सहभाग राहणार झाला होता, कार्यक्रमामध्ये पाहुण्याचा परीचंय श्री किशोर पत्तीवार, श्री साई आय.टी.आय. भद्रावती चे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक यांनी केले. प्रास्ताविक श्री भै.गो. येरमे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटकिय माहिती डॉ. विनोद गोरांटीवार यांनी केले. त्यानंतर श्री भालचंद्र रासेकर, प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा, श्री अमित गुंडावर, सामाजिक कार्यकर्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा, सौ करूना किशोर पत्तीवार सचिव भारत शिक्षण संस्था, भद्रावती, श्री साहिल किशोर पत्तीवार, डायरेक्टर पतीवार फ़ौन्देशन भद्रावती, यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्ष स्तानी रवींद्र एस. शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यर्त्याचा स्तुत गुनावर् तथा रवींद्र शिंदे चारीटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांचा विविध योजनेबद्दल माहिती दिली. आभार प्रदर्शन श्री साई आय. टी. आय. भद्रावती चे प्राचार्य श्री राजेश नगराळे यांनी केले. त्यानंतर सर्व कंपन्यांनी आपापली सविस्तर माहिती विद्यार्त्याना दिली. कार्यक्रम यशश्वी करण्याकरिता श्री साई आय. टी. आय. भद्रावती प्रोजेक्ट इन्चार्ज कौस्तुभ गाडेकर, निदेशक श्री. ताराचंद उमरे, श्री.विशाल जगताप, श्री.प्रमोद साखरकर, श्री.क्विकास बद्खल, कु अश्विनी भासारकर, कु. गीरीश्मा नागदेवे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशश्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये