ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चिचोर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी
शिवसेने तर्फे आरो भेट : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्त्वाचे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोर्डी येथे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे याकरीता शिवसेना ( उभाठा ) च्या वतीने आरो भेट देण्यात आला. प्राथमिक शाळेत एक ते सात पर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी शुद्ध पाणी हे महत्त्वाचे असते याकरीता शिवसेना ( उभाठा ) वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोर्डीला आरो भेट देण्यात आला.
यावेळी ठाणेदार बिपिन इंगळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख महेश जीवतोडे, मुख्याध्यापक नगराळे, मंगेश शिरसागर, मिलिंद कांबळे, महादेव बांगडे आदी उपस्थित होते.