केपीसीएल खान बंद करण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्त आंदोलकांना मिळाली १४९ चा नोटीस
५० दिवसापासून आंदोलन सुरूच : महिला आंदोलनावर ठाम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) कंपनी विरोधात बरांज येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी पुन्हा दिनांक २९ ला केपीसीएल खान बंद करण्याचा पवित्रा घेतल्याने त्याकरीता पोलीस संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महिला आंदोलन करत्यांना ३७ कलम चालू असल्याने केपीसीएल खान बंद करण्यासाठी आंदोलन करता येणार नाही असे म्हणत भद्रावती पोलिसांनी १४९ चा नोटीस देऊन बजावले आहे.
केपीसीएल कंपनीने या गावातील जमीन संपादित करून कोळसाचे उत्पादन सुरू केले. पुनर्वसन न करता उत्खनन केले. त्यामुळे १२६९ कुटुंबांना नुकसान भरपाई दिली नाही. पुनर्वसन केले नाही. अशा १८ मागण्या घेऊन बरांज येथील महिलांचे उपोषण सुरू होऊन आज आंदोलनाचा ५० वा दिवस आहे. दिनांक २३ जानेवारीला खान बंद करणाऱ्या शंभर महिलांना अटक करून पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली तरी सुद्धा महिलांचे आंदोलन सुरूच आहे. याकडे केपीसीएल कंपनी व प्रशासनाने लक्ष दिले नाही. दिनांक २९ जानेवारीला पुन्हा केपीसीएल खुली कोळसा खान पूर्णता बंद करण्याकरता तलाठी विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात येतील प्रकल्पग्रस्त महिलांनी आंदोलन करण्याकरता सरक्षण मागितले मात्र पंचशीला कांबळे राहणार बरांज यांना ठाणेदार यांनी नोटीस दिला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी १५ / १ / २०२४ ते दिनांक ३० / १ / २०२४ पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) व( ३ ) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात खान बंद करून कोळसा वाहतूक थांबणार नाही व कायदा व सुव्यवस्था भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा नोटीस भद्रावती पोलीसांनी दिला आहे. या प्रकारामुळे बरांज येथील महिलांचे खान बंद आंदोलन काय वळन घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.