ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारंज्याचा तलाठी तीन हजार रुपयांसाठी एसीबीच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   तक्रारदार यांच्या वडीलोपर्जित भूदान मध्ये मिळालेल्या पटयाचे शेताचे पडताळणी अहवाल भूदान यज्ञ मंडळाला देणे करीता स्वतःचे आर्थिक लाभासाठी 3000 /- रु स्विकारण्याची तयारी दर्शविल्याप्रमाणे आलोसे यांनी त्यांच्या दालन तहसील कार्यालय कारंजा (घा )येथे 3000 रू/ रक्कम स्विकारली.

यातील आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता लाच रकमेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारली आहे. आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून,पोलीस स्टेशन कारंजा (घा )जी. वर्धा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    सदर मार्गदर्शन मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर श्री. सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर

   श्रीमती. अनामिका मिर्झापूर, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र,नागपुर.तसेच अभय आष्टेकर पोलीस उपअधीक्षक सदरची सापळा कार्यवाही पथक संदीप मुपडे पोलीस निरीक्षक स फौ रवींद्र बावनेर,पोहवा.संतोष बावणकुळे, प्रशांत वैद्य,पोशी. कैलास वालदे,प्रदीप कुचनकर,प्रितम इंगळे, म ना पो शी स्मिता भगत चानापोशी निलेश महाजन सर्व ला. प्र. वी.वर्धा.हैश वैल्यू घेण्यात आली आहे.           वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.

   1) मा.श्री.राहुल माकणीकर सर, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923252100. 2) अभय आष्टेकर, पोलीस उप अधीक्षक,ला. प्र.वी.वर्धा मो. नं.8275088797 संदिप मूपडे पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. वर्धा.मो. क्र. 9975337552 दुरध्वनी 07152-243844@ टोल फ्रि क्रं. 1064

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये