Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शैक्षणिक कागदपत्रामध्ये त्रुटी असतानाही निवड करण्यात आल्याने भरतीत मोठा घोळ

३० जागांकरिता पदभरतीची प्रक्रिया ; प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी

चांदा ब्लास्ट

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने ३० जागांकरिता पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीत स्थानिक आणि विदर्भातील उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक उमेदवारांना डावलून विदर्भ व राज्याबाहेरील उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रामध्ये त्रुटी असतानाही निवड करण्यात आल्याने भरतीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

पदभरतीच्या जाहिरातीनुसार एससी (१), व्हीजे -ए (१), एनटी-बी (१), एनटी-सी (२), एनटी-डी (१), एसबीसी (१), ओबीसी (९), ईडब्ल्यूएस (३) व खुला (११) असे आरक्षण होते. या सर्व जागांसाठी मराठी भाषेत उमेदवार प्राविण्य असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. गडचिरोली हा विदर्भातील मागास जिल्हा असून येथील विद्यापीठात स्थानिक किंवा विदर्भातील उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात विदर्भ व राज्याच्या बाहेरील उमेदवारांची निवड करण्यात आली. हा स्थानिक उमेदवारांवर मोठा अन्याय आहे.

निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. काही विषयांच्या मुलाखतीमध्ये पात्रता नसलेल्या विषय तज्ज्ञांना बोलविण्यात आले होते. हा सर्व प्रकार नियमबाह्य असल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये