ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूलच्या निकालाची परंपरा कायम…

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही नेत्रदिपक यश संपादन करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत अश्मित रविंद्र मक्कड या विद्यर्थिनीने 97% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला.

या परीक्षेत शौर्यकुमार प्रविण प्रसाद याने 96.60%, घेवून द्वितीय क्रमांक तर अथर्व राजेंद्र उमाटे याने 96.20% गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शौर्यकुमार प्रविण प्रसाद याने सामाजिक शास्त्रात शत प्रतिशत गुण प्राप्त केले.

शाळेतील एकुण 90 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून त्यापैकी 21 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. तसेच तोषल महेश पराते (96%), सान्वी पंकज ढुमणे (96%), अभिनव सतिश पोडे (96%), युगांती जमनादास रायपुरे (94.20%), युग मनोज माकोडे (94%), मिथीलेश मंगेश देशपांडे (94%), इश्ना युवराज सहारे (93%), तन्वी बालाजी राठोड (93%), धृव अविनाश मुंगुले (92.60%), निहा भाविक चिवंडे (92.40%), विदिका कृष्णा येरणे (92%), दिपिका मनोज टोंगे (92%), आर्या गजानन ढवस (91%), सिमरन दिपक गंडले (91%), सायली सचिन शिंदे (91%), प्रद्युम्ना सेल्वाकुमार चेत्तियार (90.20%), मोहुल अमित आक्केवार (90%), अनुप शंकर पिंपळकर (90%) असे गुण प्राप्त केले आहे.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांकडून विशेष तयारी, वेगवेगळ्या पद्धतीच्या सराव परीक्षा, शिक्षकांचे मार्गदर्शन व परीश्रम, अभ्यासातील सातत्य, वेळेचे योग्य नियोजन म्हणजेच उत्कृष्ट निकाल. विद्यार्थ्यांकडून संपूर्ण वर्षभरात या सर्व गोष्टी करून घेतल्या जातात त्यामुळेच नेत्रदिपक निकालाची परंपरा कायम राखली आहे. अशा प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केल्या.

चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट यश मिळवित शाळेचे नावलौकीक वाढवले आहे, असे मनोगत शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी व्यक्त केले.

प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या संचालिका, प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून उज्ज्वल भविष्याकरीता शुभेच्छा देवून आनंद व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये