ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी दारूचि अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहणावर कार्यवाही

डी. बी. पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दी.24/01/24 रोजी मुखबिर कडून खात्रीशिर माहिती मिळाली की एक सिल्वर रंगाची चार चाकी वाहणा मध्ये देशी दारूचि अवैधरीत्या वाहतुक करून महाकाली नगरी हिंगणघाट येथे येत आहे. अश्या माहिती वरून महाकाली नगरी येथे एक मारुती सुजूकी कंपनी ची सिल्वर रंगाची वाहण क्र. MH 02 BM 6447 आली पो स्टॉफ चे मदतिने सापळा रचून पकड़न्याचा प्रयत्न केला असता सदर वाहण चालक त्याचे ताब्यातील वाहण झाड़ा झुडपाचा फायदा घेवून वाहण सोडून मोकयावरुण पसार (फरार)झाला. सदर वाहनाची पंचासमक्ष पहाणी केली असता सदर वाहणा मध्ये मागील सीटवर व डिक्की मध्ये 7 स्टार डिस्टिलरिज देशी दारू लिहून असलेल्या सिलबंद खरड़याच्या एकूण 20 पेट्या प्रति पेटीमध्ये 90 ml च्या 100 सिलबंद देशी दारूच्या निपा प्रमाणे एकूण 2,000 सिलबंद निपा व सिल्वर रंगाची सुजूकी कंपनीची रिटस कार क्र. MH 02 BM 4667 असा जु. की 5,00,000 रु. चा माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक नुरुल हसन सा. मा. अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे सा. यांचे नेतृत्वात मा. उप विभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित सा.यांचे मार्गदर्शनात मा.पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांचे निर्देशानुसार पो. उपनी संदीप ताराम, डी.बी पथक प्रमुख पो. हवा. सुमेध आगलावे, अज़हर खान, पो ना. राहुल साठे, पो. अम. आशीष नेवारे, अमोल तिजारे यानी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये