ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेचा उत्साहात समारोप

भाजप, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात जिवती तालुक्यात ३ ते १२ सप्टेबर दरम्यान काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या उत्साहात पार पडली. १२ सप्टेबर ला सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात जिवती येथील विदर्भ महाविद्यालय परिसरातून पदयात्रा सुरू झाली. जिवती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत रामराव महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरात पदयात्रा काढून शेवटी नगरपंचायत रंगमंच येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी जिवती तालुक्यातील भाजप, शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गुडशेला येथील शेतकरी संघटनेचे तुकाराम कांबळे, तुमरीगुडाचे भाजप कार्यकर्ते सरपंच वासुदेव गेडाम,ग्रा. प सदस्य चिनू पाटील कोटनाके, नारपठारचे सुधाकर जाधव यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. धोटे यांनी सर्वांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.

या प्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते भीमराव पाटील मडावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावळे, उत्तम कराळे, नारायण वाघमारे, डॉ. अंकुश गोतावळे, अशपाक शेख, भोजूपाटील आत्राम, राम चव्हाण, नामदेव पाटील जुमनाके,महिला काँ. अध्यक्ष नंदाताई मुसने, अनिता गोतावळे, जयश्री गोतावळे, विजय राठोड, दत्ता तोगरे, कलीम शेख, शबीर शेख, ताजुद्दीन शेख, डोईफोडे, रामदास रणवीर, बाळू पतंगे, मारुती मोरे, दत्ता गायकवाड, बंडू राठोड, गणेश वाघमारे, प्रल्हाद राठोड, बाबाराव कांबळे, साबणे, शिंदे मॅडम, कमल जाधव, लहुजी गोतावळे, डॉ. बनसोड, जब्बारभाई, रफिक पठाण, नागनाथ मोठे, भागवत गीते, रवी डफडे, जाधव, ठोंबरे, केशव भालेराव, मुद्रिका कांबळे, मारुती कोडापे, सुरेश कोडापे, सुनील शेळके, वजीर शेख, गजानन राठोड, प्रवीण राठोड, आशिष दसाने, विष्णू रेड्डी यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम कराळे यांनी केले. संचालन डॉ. अंकुश गोतावळे यांनी तर आभार प्रदर्शन सिताराम मडावी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये