ताज्या घडामोडी

एस टी कर्मचाऱ्यांना शासनाची मोठी भेट – आता मिळणार शासकीय कर्मचाऱ्यंप्रमाणेच महागाई भत्ता

दहा वैद्यकीय चाचण्या मोफत

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र शासनाने एस टी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असुन यापुढे एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार असुन दहा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासकीय सेवेत समायोजित करून घेण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यभर मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी न्यायालयाने मध्यस्ती करून संप मिटविला होता. आता मात्र युती सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला असुन ह्या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे हे विशेष.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये