ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे बैलमपूर येथे काँक्रेट बंदिस्त नाली बांधकामचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड,माणिकगढ कंपनीचे युनिट हेड अतुल कन्सल, वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत व ईआर हेड नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शन व सहाय्याने माणिकगढ कंपनीचे सी एस आर पथक,लोकांची गरज समजून जवळपास असलेल्या गावांच्या विकासाकडे पाऊले टाकत आहेत.

यावेळेस माणिकगड सीएसआर कडून बैलमपूर येथे 100 मीटर काँक्रेट बंदिस्त नाली बांधकामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत जामणी चे सरपंच जगदीश किन्नाके व उपसरपंच अशोक चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आलेत.

ही नाली मुख्य रस्तावरील बुद्ध विहार ते शाळेकडील मार्गाने एकूण 100 मीटर बांधण्यात येणार असून नालीवर कव्हर सुद्धा टाकण्यात येणार आहेत.

या वेळी सरपंच, उपसरपंच,गांवतील प्रतिष्टीत नागरिक व सी एस आर पथक उपस्थित होते.

पावसाळ्यात गांवतील वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने ते पाणी लोकांच्या घरामध्ये शिरत होते व त्यामुळे लोकाना नाहक त्रास होत होता हे लक्षात घेता नाली बांधकामचे कार्य सुरु केलेत या अगोदर सुद्धा बैलमपूर मध्ये 160 मीटर रोड, शाळेला बाला पैंटिंग, विध्यार्थी यांना स्कूल बॅग्स, नोटबुक्स व बसण्याकरिता चटई चे वाटप करण्यात आलेत तसेच गांवतील बसस्टॉप पैंटिंग, कचरा टाकण्यास डस्टबिन्स, बसण्याकरिता बॅंचेस व आरोग्य शिबीर आणि नेत्र तपासणी शिबिर घेऊन गरजूना चष्मा व औषधोपचार करण्यात आले असे बैलमपूर चे उपसरपंच यांनी सांगितले व या सर्व कार्यकारिता माणिकगढचे आभार व्यक्त केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये