तहसिलदार वैशालीताई डोंगरजाळ यांच्याहस्ते होणार आषाढी एकादशीला प्रशासकीय महापूजा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत नरहरीनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे मागील तीन वर्षांपासून प्रतिवर्षी आषाढी एकादशीचे पर्वकाळी माननीय तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ यांचे हस्ते प्रशासकीय महापूजेचे आयोजन करण्यात येत आहे.
यंदा या प्रशासकीय महापूजेचे चौथे वर्ष आहे, यानिमित्ताने दिनांक ३० जून २०२५ रोजी ह.भ.प.श्री. उदबोध मोहननाथ महाराज पैठणकर यांनी तहसीलदार मा.श्री.वैशालीताई डोंगरजाळ यांची भेट घेऊन दिनांक ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीचे दिवशी संपन्न होणाऱ्या महापुजेचे संस्थानच्या वतीने निमंत्रण दिले. त्यांच्या समवेत श्री.पंडितराव पाथरकर, श्री.बळीराम मापारी मामा, श्री.प्रकाश अहिरे, श्री.सुहासजी जोशी हे उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या पर्वकाळी संपन्न होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा सर्व भाविकांना लाभ घ्यावा असे संस्थानच्या वतीने आवाहन देखील करण्यात येत आहे