गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतूक करणारा रेती ट्रॅक्टर पोलीसांनी पकडला

एकूण 9 लाख 9 हजारांवर मुद्देमाल जप्त करून रेती चोरीचा गुन्हा दाखल

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दि. 24/01/2024 रोजी आम्ही पथकासह पो.स्टे. पुलगाव हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना, मुखबिरकडून मिळालेल्या माहितीवरून मौजा गुंजखेडा परिसरात नाकाबंदी करून यातील काळ्या रेतीचा ट्रॅक्टर पकडला असता ट्रॅक्टर चालक हा वर्धा नदीपात्रातील घाटातून रेतीची चोरी करुन तिची विक्रीकरिता वाहतूक करीत असताना मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक/मालक :- अमोल राजेंद्र कगाले , वय 35 वर्ष, रा. वॉर्ड न 2, गुंजखेडा ता देवळी जि. वर्धा, आरोपीच्या ताब्यातुन 1) एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकचा ट्रॅक्टर किं. 7,00,000/-रु, 2) एक लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली कि.2,00,000/-, रु 3) 1 ब्रास (100 फूट ) रेती किंमत 9,000/-रु. मोका जप्ती पंचनामा प्रमाणे जु की. 9,09,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन आरोपिविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास करता आरोपी स्टेशन डायरी अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले.

         सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात संतोष दरगुडे, विकास अवचट, राकेश आष्टनकर, हर्षल सोनटक्के यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये