ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पालक सचिव मिलींद म्हैसकर यांची बापूकुटीला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलींद म्हैसकर यांनी आज सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. 1999 ते 2003 या कालावधीत जिल्हाधिकारी असतांना मंत्री महोदयांच्या दौऱ्याप्रसंगी बापुकुटीला भेट देण्याचा योग यायचा. त्यावेळी असलेल्या बापुकुटीतील साहित्यासोबतच व्यवस्थापन आजही त्याच स्थितीत आहे. या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे विजय तांबे यांनी आश्रम विषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, तहसिलदार संदीप पुंडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले आदी उपस्थित होते.



