ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील दारुविक्रेत्या इसमाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतीत दारुविक्रेता इसम नामे शेख अफसर उर्फ डिंग्या शेख असलम वय ३४ वर्षे रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाटचे अभिलेखावर सन २०१८ पासून शरीराविरुध्द ०२ गुन्हे व महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत २४ गुन्हे असे एकुण २६ गुन्हे नोंद आहे. सन २०१८ पासुन स्थानबध्द इसम नामे शेख अफसर उर्फ डिंग्या शेख असलम याने पोलीस स्टेशन, हिंगणघाट परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. शेख अफसर उर्फ डिंग्या शेख असलम याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व त्याची गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने त्याचे विरुध्द कलम ५६ (१), (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये शेख अफसर उर्फ डिंग्या शेख असलम यास २० दिवसाकरीता वर्धा जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले होते. तसेच कलम १२९ (ई) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत एक वर्षाकरीता अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसुन त्यानंतरही सतत गुन्हे करीत होता.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. अनिल राऊत पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मथी सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन शेख अफसर उर्फ डिंग्या शेख असलम यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, तसेच आगामी, गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी याप्रकारचे सण उत्सव शांततेत पार पडावे या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहे.

सन २०२५ मध्ये एकुण १८ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच सन २०२६ मध्ये अद्याप पावेतो ०९ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात पो.हवा. अमोल आत्राम, पो.हवा. आशिष महेशगौरी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. अनिल राऊत, पोलीस अंमलदार पो.हवा. प्रविण देशमुख, पो.अं. संग्राम मुंडे, शिवशंकर यादव, संतोष लोहटे, शुभम गावंडे पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी केली आहे.

–स्वा (विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये