ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामसेवक (महिला) यांच्यावर अँटी करपशन ब्युरोची कारवाई.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो. स्टे.पुलगाव जिल्हा वर्धा येथील ग्रामसेवक अर्चना किसनराव बागडे, वय 43 वर्ष यांना 2000/- रुपयाची लाच स्वीकारताना अँटी कारपशन ब्यूरो वर्ध्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे राहणार बोदड,ता.जी. वर्धा येथील रहिवासी असून त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. दि.17/07/24 रोजी तक्रारदार हे सकाळी कार्यालयात आले व त्यांनी बोदड मधील एमनरेगा अंतर्गत त्यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात सिंचन विहीर बांधकाम करण्याची मंजुरी मिळाली. सदर स्कीम ही 300000/- रुपयाची असून पैकी तक्रारदारास आतापर्यंत 43573/- रुपये ग्रामपंचायत मार्फत प्राप्त झाले. अजून उत्वरीत बांधकामांचे 36710/- रुपये तक्रारदारास मिळणे बाकी होते. तेच पैसे काढून देण्याकरिता ग्रामसेवक तक्रारदारास 2000/- रुपये लाच रकमेची मागणी करत होती. परंतु तक्रारदार यांची आलोसे यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथे तक्रार दिली.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाच मागणी संबंधाने पडताळणी करण्यात आली करण्यात आली असता आलोसे अर्चना किसनराव बागडे ग्रामसेवक यांनी तक्रारदारास उवरवरित कामाचा चेक देण्याकरिता 2000/- रू. लाचेची मागणी करुन 2000/- रू. बोदड ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारले त्यानंतर अलोसे अर्चना किसनराव बोदड यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारणा अधिनियम) 2018 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई श्री राहुल माकणीकर पोलीस अधिक्षक लाप्रवी नागपूर, श्री संजय पुरंदरे अप्पर पोलिस अधीक्षक,श्री अभय अष्टेकर पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सुहासिनी सहस्त्रबुद्धे, मंगेश गंधे स फौं.,संतोष बावणकुळे,पोहवा, नापोशि राखी फुलमाळी,कैलास वालदे, स्मिता भगत,पंकज डहाके, पोशि प्रदीप कूचनकर,प्रशांत मानमोडे चालक निलेश महाजन,सगळे लाप्रवी वर्धा यांनी यशस्वी कारवाई केली.

लप्रवी तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये कोणी अधिकारी कर्माचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया लाप्रवी विभागाशी संपर्क साधावा.

पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नागपूर.
दूरध्वनी क्रमांक -0712-2561520
टोल फ्री क्रमांक – 1064

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये