ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे पल्लेझरी येथे मोफत आरोग्य शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांद्वारे विविध उपक्रम राबवते, ज्यात गावातील लोकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. हे लक्षात घेऊन धन्वंतरी प्रकल्पांतर्गत एका मागून एक असे मोफत आरोग्य शिबीर जीवती तालुक्यातील वेगवेगळ्या गावात राबवित असताना आपण बघत आहोत.

 दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी जिवती तहसील येथील . ग्रामपंचायत पल्लेझरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सी.एस. आर. अंतर्गत केले. एकूण 170 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला यामध्ये गावातील पुरुष, महिला, वृद्ध व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी अल्ट्राटेक,माणिकगढ चे ई. आर. हेड श्री नवीन कौशिक , धुरपताबाई बापुजी सीडाम सरपंच, लाला फजानीया शेख उपसरपंच ,घोडमारे साहेब सचिव मरकागोंदी ,डॉक्टर सुरज सोळंके वैद्यकीय अधिकारी टाटा कॅन्सर केअर चंद्रपूर , डॉक्टर ट्विन्कल डेंगळे, डॉक्टर रूपाली यादव ,प्रवीण कडूजी बुचे मुख्याध्यापक, कमलाबाई नागोराव मडावी ग्रामपंचायत सदस्य, ललिताबाई माणिक मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, बापूजी शिडाम प्रतिष्ठित नागरिक अनिल गुलाबरावj आंबटकर सहाय्यक शिक्षक, काजल ताई मते (सी एच ओ )नंदपा यशोदा ताई राठोड (एच ए )पाटण ए के यमलेल (ए एन एम) नंदप्पा नताशा देऊरकर स्टाफ नर्स, काजल विश्वास स्टाफ नर्स, वैष्णवी सहारे (डी इ ओ) सौ सुरेखाताई रामचंद्र गायकवाड आशा वर्कर पल्लेझरीसरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या शिबिरात तोंडाच्या, गर्भाशयाच्या व स्तनाच्या कर्करोगाची तपासणी टाटा कॅन्सर केयर फौंडेशन च्या टीम कडून करन्यात आलेत. तसेच प्रा. आ. केंद्र पाटण येथील पथकद्वारे बीपी आनी शुगर ची चाचणी करण्यात आली या आरोग्य शिबिराला यशस्वी करण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड येथील डॉक्टरांच्या टीमने आणि सी. एस. आर. टीम ने अथक परिश्रम घेऊन हे शिबीर यशस्वी केले. या शिबिरादरम्यान नवीन कौशिक जी यांनी गावातील नागरिकाच्या आरोग्य बद्दल जाणून घेतले. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांनी माणिकगड युनिटचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये