ताज्या घडामोडी

बोलेरो पिकअप ने दुचाकीला चिरडले – भिषण अपघातात १ जागीच ठार तर २ गंभीर

आर. एस.बार समोरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

प्रा. शेखर प्यारमवार, सावली

सावली वरून एक किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आर एस बार अँड रेस्टॉरंट समोर सावली वरून गडचिरोली कडे भरधाव वेगाने जाणारी बोलेरो पिकप गाडी क्रमांक एम एच ३१ डीएस ०९३९ या गाडीने दुचाकीला मागुन धडक दिल्याने शोभा नामदेव धारणे वय 55 राहणार विहीरगाव या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर धर्मराज पांडुरंग गायकवाड वय 45 वर्ष आणि निखिल युवराज गायकवाड वय 23 वर्ष हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालय सावली येथे तातडीने भरती करून उपचार करून गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

मयत महिला व जखमी दोन पुरुष राजगड येथे आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त गेले होते परतीचा प्रवास करताना सदर घटना घडली बोलोरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सावली पोलीस स्टेशन ठाणेदार जीवन राजगुरू यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये