ताज्या घडामोडी

वाघांच्या झुंजीत दोन वाघांचा मृत्यु – ताडोबा अभयारण्यातील घटना

गस्ती दरम्यान वन रक्षकास आढळले मृतदेह

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी कोळसा वनपरिक्षेत्र, नियतक्षेत्र संगम, उपक्षेत्र झरी कक्ष क्र. 338 पानघाट कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात वनरक्षकास गस्ती दरम्यान दोन वाघांचे मृतदेह आढळुन आले. एका वाघाचे पृष्ठभागाकडून दुस-या वाघाने अंशता मांस भंक्षण केलेले दिसले. पूर्णपणे शाबुत असलेला वाघ हा टी 142 नर असुन अदाजे वय 6- 7 वर्षे आहे. कमी वयाचा दुसरा वाघ हा T-92 या वाघीणीचा मादी बच्चा आहे, अंदाजे वय 2 वर्षे आहे.

दिनांक 20/01/2024 ते दिनांक 21/01/2024 चे रात्री झालेल्या वाघाच्या झुंजीत सदरील दोन वाघांचा मृत्यु झाल्याचा कयास आहे. परिसराची कॅमेरा ट्रॅपच्या द्वारे अधीक माहिती गोळा करण्यात येत आहे.

वाघाचे मृतदेह टी टी सी चंद्रपुर येथे पाठविले आहे. दिनांक 23/01/2024 रोजी सकाळी टी टी सी चंद्रपुर शवविच्छेदना दरम्यान मृत्युचे नेमके कारण काय त्यांचा अंदाज येईन. नमुने डी एन ए चाचणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे.

मौका पंचनामा करते वेळी नंदकिशोर काळे उपसंचालक (कोर), वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), कोळसा, रुदंन कातकर व बंडु धोतरे, एन टी सी ए प्रतिनिधी व डब्लू पी एस आय चे मुकेश भांदककर, वन्यजीव संशोधक क्रीष्णन डब्लु आय आय, ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकारी खोब्रागडे व जीवशास्त्रज्ञ यशस्वी राव व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये