ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यात दारू निर्मितीचा कारखाना आणू नये

डॉ. अभय बंग यांच्या मागणीला शेतकरी संघटनेचा पाठिंबा

चांदा ब्लास्ट

राज्यात चंद्रपूर येथील दारू दुकान बंदी राज्य सरकारने उठविली असली तरी गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी कायम आहे. गडचिरोली येथील दारू दुकान बंदी वेगवेगळ्या महिला संघटनांच्या व विविध सेवाभावी संघटनांच्या तसेच अनेक समाज संघटनांंच्या अखंड लढ्यानंतर राज्य शासनाने केली आहे. जेष्ठ समाजसेवक मा.डॉ.अभय बंग यांनी दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू निर्मितीसाठी शासनाने निर्णय घेतलेल्या कारखान्याच्या निर्मितीला स्पष्ट भूमिका घेऊन विरोध केला आहे.
शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचा डाॅ.अभय बंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेस जाहीर पाठिंबा असून त्यांनी यापुढे कोणत्याही आंदोलनाची भूमिका घेतल्यास शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडी सक्रिय सहभाग घेणार असून आंदोलनाला जाहीर समर्थन जाहिर करीत आहे. शेेतकरी संंघटना गडचिरोली जिल्ह्यात शासन प्रयत्नांनी आणल्या जाणाऱ्या दारू निर्मिती कारखान्यास ठाम विरोध करीत आहे.
               शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम पुढे आले असुन गुन्हेगारीचा ग्राफही कमी झाला आहे. शिवाय यामुळे नागरिकांचे जीवन सुखमय झाले आहे. म्हणूनच डॉ. अभय बंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेला शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, चंद्रपूर जि.प.माजी समाजकल्याण सभापती निळकंठ पाटील कोरांगे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकुर, अरुण पाटील मुनघाटे, शालिक नाकाडे, घिसू पाटील खूणे, महिला आघाडी अध्यक्ष जोत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, प्रा. सतीश मोहितकर, प्रा. निळकंठ गौरकार,ॲड. शरद कारेकर, सुधीर सातपुते, दादा नवलाखे, डॉ.संजय लोहे, दिनकर डोहे, सुनील बावणे यांनी पाठींबा जाहिर केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये