ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षण विभागा मार्फत नवनियुक्त शिक्षकाचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिल्हा परिषद,प्राथमिक शिक्षण विभाग चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसटीई कोर्स राबविण्यात आला होता. (Cste computer science teaching excellence ) यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेवारगुडा, केंद्र टेकामांडवा येथील नवनियुक्त शिक्षक गजानन विठ्ठल लढे यांना टॅब,प्रशासित पत्र, व लॅपटॉप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तंत्रज्ञान काय आहे दैनंदिन जीवनात त्याचा काय उपयोग होतो, कॉम्पुटर म्हणजे काय, computetinal thinking म्हणजे काय त्याचा वर्गात शिकवताना कसा उपयोग होतो , त्यामुळे विद्यार्थ्यांत सृजनशीलता कशी निर्माण करता येईल, CT चा वापर करून आपण एखादी समस्या कशी सोडऊ शकतो, कोडींग म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय, कोडींग चे प्रकार आणि त्यातील ब्लॉक बेस कोडींग वापरून प्रोजेक्ट्स तयार करणे.

या प्रोजेक्ट्स मध्ये विद्यार्थ्यांमधील संभाषण, शिक्षक विद्यार्थी संभाषण कार्टून च्या माध्यमातून तयार करणे, प्रत्यक्ष डिजिटल क्लॉक तयार करणे, विद्यार्थ्यांना पत्यक्ष भौमितिक आकृत्या कोडिंग द्वारे तयार करुन शिकवणे इत्यादी गोष्टीवर आधारित असलेला हा टास्क तंत्रस्नेही नवनियुक्त शिक्षक गजानन लढे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला होता.म्हणून त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश पातळे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विशाल देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या या यशाबद्दल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी धनराज आवारी , विस्तार अधिकारी अण्णाराव आडे, केंद्रप्रमुख सुनील जाधव, मुख्याध्यापक नागनाथ तिडके यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये