ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात?

चार महिन्यांपासून मानधन थकीत- राज्यअध्यक्ष ऋषिकेश शिलवंत

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : – जल जीवन मिशन हा केंद्राचा व पंतप्रधान मोदी यांच्या अजेंड्यावर असलेला जल जीवन मिशन प्रकल्प आहे, या योजनेमार्फत आज ग्रामीण भागात शुद्ध,शास्वत व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यात येतो परंतु यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून पगार मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची माहिती ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेचे राज्यअध्यक्ष ऋषिकेश शीलवंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रभरातील या योजनेत काम करणारे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ, मनुष्यबळ तज्ञ, वित्त नी संपादणूक तज्ञ, पाणी गुणवत्ता तज्ञ व तालुकास्तरीय बी. आर. सी. व सी. आर. सी. आदी कर्मचारी काम करतात. जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने हे कर्मचारी ग्रामीण भागात पाणी पट्टीकर गोळा करण्यासंदर्भात, योजनेची प्रभावी अमलाबजावणी, गावातील ग्रामस्थाच्या बैठका घेतात, पाणी गुणवत्ता या विषयी मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतात. मात्र, जुलै 2025 पासून ते आजपर्यंतचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसेच प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांना निवेदने सादर करून मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.

         या कर्मचाऱ्यांचे वेळेवर मानधन मिळाले नाही, तर दिवाळी सणाच्या काळात कर्मचारी यांची घरे अंधारात राहतील.

जिल्हा व तालुकास्तरावर काम करणारे हे कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करतात. या मानधनातूनच घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घराचे बँकेचे हप्ते, आरोग्यावरील खर्च भागवावा लागतो. त्यामुळे सध्या त्यांच्यावर प्रचंड मानसिक आणि अर्थिंक ताण निर्माण झाला आहे.

कर्मचाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांना दिवाळी सण आनंदात साजरा करता येईल.

         राज्य सरकारने सर्व विभागाचा निधी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यामध्ये गुंतवल्या मुळे आमचे पगार द्यायला सरकारकडे निधी नाही. “आम्ही वेळोवेळी राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही म्हणून मानधन देणे शक्य नाही,” अशी मोघम उत्तरे मिळत आहेत. संघटनेमर्फत पाणी पुरवठा मंत्री यांना भेटून पगारबाबत अवगत करण्यात आले परंतु त्यांचेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

        ऋषिकेश शिलवंत, राज्यअध्यक्ष ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटना

        एकीकडे शासन दिवाळी आधी वेतन देण्याचे शासन निर्णय काढत आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन ने या निर्णयाला निधी उपलब्ध नाही हे कारण देऊन केराची टोपली दाखवली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये