चांदाब्लास्ट विशेष

कोरपना नगरपंचायत 59 नामकरण अर्ज दाखल

उद्या किती नामांकन अर्ज मागे होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले .

चांदा ब्लास्ट: प्रमोद गीरडकर (प्रतिनीधी)

कोरपना नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता 7 डिसेंबरला 59 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक 8 डिसेंबर असून किती नामांकन अर्ज मागे होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

कोरपना निवडणुकी या वर्षी मोठी रंगतदार निवडणूक होणार असून कोरपना नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये दिग्गज उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत तेव्हा ही निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे या नगरपंचायतीच्या नवीन निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी कोरपना नगरपंचायत निवडणूक कडे लक्ष केंद्रित केले आहेत तेव्हा राजुरा विधानसभेतील चार आजी-माजी आमदाराची सुद्धा प्रतिष्ठेची निवडणूक समजली जात आहेत कोरपना येथील मतदार नेमका कोणाला कौल देतील हे मात्र येणारी वेळेच ठरवणार आहे.

 

ओबीसीचे आरक्षणामुळे कोरपना येथील तीन प्रभागात निवडणूक होणार की नाहीत यावर मात्र राज्य सरकार काय निर्णय देतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले
आहे.

उमेदवारी अर्ज मात्र दाखल केले आहे आठ डिसेंबरला ओबीसी प्रवर्गातील अर्ज मागे होतील काय? परत शासन निर्णय काय देतील याकडे सर्वांच्या नजरा लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button