ताज्या घडामोडी

अभाविप तथा एसएफडी वरोरा तर्फे शाळा महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपण

अभाविप वरोरा आणि एसएफडीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वरोरा तथा स्टुडंट फाँर डेव्हलपमेंटच्या वतीने १४ ऑगस्ट- अखंड भारत संकल्प दिनाचे औचित्य साधून वरोरा शहरांतील शाळा महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

अभाविपने अमृत वर्षानिमित्त संपूर्ण देशात एक करोड वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करणे असे लक्ष निर्धारित केले आहे. या उपक्रमांतर्गत अभाविप वरोरा आणि एसएफडीच्या कार्यकर्त्यांनी १४ ऑगस्टला वरोरा शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले आणि त्यांना सोबत घेऊन निर्धारित जागांवर वृक्षारोपण करण्यात आले.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकाराम यांच्या उक्तीप्रमाणे वृक्षांबरोबर नाते जोडण्याचे कार्य उपरोक्त अभाविप कार्यकर्ते करीत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाबाबत जाणीव निर्माण व्हावी आणि पर्यायाने या वसुंधरेचे आणि मानवी जीवनाचे रक्षण व्हावे असा हेतू हा कार्यक्रम राबविण्यामागील असल्याचे अभाविप कार्यकर्त्यांनी सांगितले.

या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रामुख्याने वरोरा अभाविप वरोरा शाखा अध्यक्षा प्रणाली बेदारकर मॅडम, अभाविप वरोरा शाखा उपाध्यक्ष सुरेंद्र उरकांडे, अभाविप नगरमंत्री कु. मोनिका टिपले,

वरोरा एसएफडी प्रमुख प्रथम पोटे, एसएफडी सहप्रमुख कु.यशश्री उरकुडे, अभाविप चंद्रपूर जिल्हा सोशल मिडिया प्रमुख शकिल शेख, वरोरा सहमंत्री सौरभ साखरकर, सहमंत्री कुणाल आसुटकर, सहमंत्री आशिष भट,लोकेश रुयारकर,नंदिनी पोटे,सोनाक्षी हरभडे,तुषार गाढवे, रिया बालवंश, वैष्णवी बालवंश, देवयानी वाढई, वेदिका वाढई, प्रणाली निखाडे, तपस्या धवने, तुषार कुथे, कार्तिक कोवळे, आदित्य निखाडे, केतन रोडे, वेदांत गजभे, संकेत देरकर, प्रणय भोंग, फकिरा निखाडे, शशिकांत दातारकर, आयुष गुजरकर आणि नगरातील अन्य अभाविप कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सद्यपरिस्थितीत अशा सकारात्मक कार्यक्रमांची गरज असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये