दिव्यांग निधीतून इलेक्ट्रीक ट्रायसीकल देण्याचे प्रस्तावित
छापील अर्ज इच्छुकांनी कार्यालयीन वेळत अर्ज सादर करावा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नगर परिषद, वर्धा अंर्तगत नोंदणीकृत सर्व अस्थिव्यंग दिव्यांगांना सुचित करण्यात येते की, आर्थिक वर्ष २०२४-२५ अंर्तगत दिव्यांग निधीतून इलेक्ट्रीक ट्रायसीकल १० देण्याचे प्रस्तावीत आहे. करिता इच्छूक व गरजू अस्थिव्यंग नोंदणीकृत दिव्यांगांनी नगर परिषद, वर्धा येथे किमान ६०% दिव्यांग असल्याचे (१) ऑनलाईन प्रमाणपत्र, यु.डि.आय. कार्ड (२) आधारकार्ड, ईलेक्शन कार्ड (३) राशन कार्ड (४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र व (४) बँक पासबुकाची छायांकित प्रत सोबत जोडून आपली नोंद नगर परिषद, वर्धा दि.३१/१/२०२५ पुर्वी छापील अर्ज कार्यालयीन वेळत अर्ज सादर करावा.
१) १० पेक्षा जास्त अर्ज सादर झाल्यास प्राधान्य क्रमानुसार व सोडत (ड्रा) करुन ट्रायसीकल अनुदानाचे वाटप करण्यात येईल.
२) अर्जदार किमान पाच वर्षांपासून न. प. क्षेत्रात रहीवासी असावा.
३) सदर दिव्यांग व्यक्तीने ट्रायसीकल बाबत कूठूनही लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.
४) सदर व्यक्तीने शासनाव्दारे ट्रायसीकलचा लाभ घेतला नाही. अशा प्रकारचे शासकीय कार्यालय उदा. समाजकल्याण यांचे नाहरकत जोडावे सादर करावे.
५) ज्या व्यक्तीला ट्रायसीकल देण्यात येईल त्या दिव्यांग व्यक्तीला ५ वर्षा पर्यंत दिव्यांग निधीचा लाभ मिळणार नाही.
६) सदर ट्रायसीकल खरेदी करण्याकरिता ५० हजार अनुदान देण्यात येईल.
७) सहपत्राप्रमाणे किमान स्पेसिफीकेशन असणारी ई-ट्रायसीकल खरेदी करणे लाभार्थ्यांस बंधनकारक राहील. व जी.एस.टी.चे देयक कार्यालयास जमा करणे बंधनकारक राहील.
८) ई-ट्रायसीकल चा वापर व्यवसायाकरीता करणे बंधनकारक राहील.
सदर अनुदान थेट पुरवठाधारकाच्या खात्यात जमा करण्यात येईल व बिल व उपयोगीता प्रमाणपत्र कार्यालयात दिव्यांग विभागात जमा करणे बंधनकारक राहील. व सदर लाभ आर्थीक वर्ष २०२४-२५ अंतर्गत दिव्यांग निधी तरतूदीस अधिन राहून करण्यात येत आहे.
मुख्याधिकारी नगर परिषद, वर्धा