Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पिक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावलेले होल्ड काढा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) चे तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

        राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची बचत खाते होल्ड केले आहे. शिवाय, त्यांना जामीन देणाऱ्या जामीनदाराच्या खात्यालाही लगाम लावला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण होत असल्याने शेतकऱ्यांच्या बचत खात्याला लावलेले होल्ड तात्काळ काढा,अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना दिले आहे.

     राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावलेले आहे. बचत खात्याला होल्ड असल्याने निराधार योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, तसेच शेतमाल मार्केटमध्ये विक्री करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे काढता येत नाही.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावून कर्ज वसुलीची सक्ती करणे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलींच्या लग्नांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी बचत खाते होल्ड केली आहे. सध्याचा 90% व्यवहार ऑनलाइन होतो, खाती होल्ड ठेवल्यामुळे खात्यात शेतमालाचे पैसे जमा होतात. मात्र ते पैसे शेतकऱ्यांना काढता येत नाही.

शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावण्याचा कोणताही अधिकार बँकांना नसताना बँकेतील कर्मचारी, अधिकारी दडपशाही करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकांनी ही मनमानी थांबवावी व पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या बचत खात्याला लावलेला होल्ड तत्काळ काढण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे पाटील, राजीव शिरसाठ, विधानसभा कार्याध्यक्ष रवी इंगळे,शहराध्यक्ष विजय खांडेभराड, रंगनाथ कोल्हे, नारायण कोल्हे, सुरज खांडेभराड, छावा संघटनेचे संतोष राजे जाधव,रफिक भाई, शिवाजी कव्हळे, अभिनव खांडेभराड, आदित्य वाघमारे, ऋषिकेश वैष्णव, शुभम थोरवे आदींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये