ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत श्री. संताजी सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी मंगेश बेले तर सचिवपदी राजू खनके यांची निवड

संत श्री. संताजी सेवा मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन एकता पॅनेलचे ११ सभासदांचा विजय 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर – सत श्री. संताजी सेवा मंडळ या कार्यकारी संचालक मंडळाची निवडणूक रविवार दि.२८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता संताजी सभागृह येथे संपन्न झाली. या निवडणुकीत विकास पॅनल’चा पराभव करून परिवर्तन पॅनलने ११ पैकी ११ संचालक या निवडणुकीत विजयी झाले.विजयी संचालकांनी अध्यक्ष पदासाठी मंगेश बेले तर सचिव पदासाठी राजू खनके यांची सर्वानुमते निवड केली. या निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विनोद नंदूरकर हे होते. या विजयासाठी सर्व समाज बांधवांनी नवनियुक्त संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या आहे.

         तेली समाज बांधवांच्या हिताच्या दृष्टीने संत श्री. संताजी मंडळाची स्थापना १९९६ मध्ये झाली.या संचालक मंडळाची निवडणूक दर पाच वर्षांनी होते. मात्र, काही कारणामुळे निवडणुकीचा कालावधी चुकल्याने मा. साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी संचालक मंडळाची निवडणुक तातडीने घेण्याचे आदेश ६ फेब्रुवारी रोजी दिले. या आदेशावरून काळजीवाहू संचालक मंडळाने २८ एप्रिल रोजी दुपारी २:०० वाजता गुप्त मतदान पद्धतीने पार पडली.

या निवडणुकीत संस्थेच्या १८५ पैकी १४० सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत विकास पॅनल समर्थित ११ उमेदवारांचा पराभव करून परिवर्तन पॅनलने ११ पैकी ११ उमेदवार निवडून आणून संत श्री. संताजी सेवा मंडळाच्या संचालक मंडळ निवडणुकीत एकहाती विजयी मिळविला.

नवनियुक्त ११ संचालकांनी सर्वानुमते कार्यकारणी गठित केली. यामध्ये अध्यक्ष म्हणून मंगेश यादवराव बेले, उपाध्यक्ष सुधाकर दादाजी घुबडे, सचिव राजेश नारायण खनके, सहसचिव अनिल दिगांबर ढोक तर कार्यकारणी सभासद म्हणून ज्ञानेश्वर पांडूरंग कामडी, जयंत तुकाराम सुरकर, विजय गुलाबराव बाबूलकर, मोहन माधवराव कळंबे, ॲड. बंडू शामराव खनके, मधुकर गोविंदा शेंडे, चंद्रशेखर सिताराम लिचोडे यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विनोद ल. नंदूरकर यांनी काम पाहिले. निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे तेली समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहे. या निवडणुकीत विजयासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व मार्गदर्शक, समाज बांधव आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अथंक परिश्रम घेणाऱ्या सर्व समाज बांधवांचे नवनियुक्त संचालक मंडळानी आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये