ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी उत्सवात प्लस्टिकचा अतिरेकी दुरुपयोग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  उच्चशिक्षित व नामवंत लोकांची संघटना असलेल्या रोटरी क्लबतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही रोटरी उत्सव साजरा करण्यात आला. परंतु नेहमी समाजापयोगी उपक्रम राबवून आपला उदो उदो करून घेणाऱ्या रोटरीच्या उत्सवात सिंगल युज प्लस्टिकचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झालेला असून पाच दिवस चाललेल्या या व्यावसायिक उपक्रमात जनतेच्या भावनांशी मोठ्या प्रमाणावर खेळ करण्यात आल्याची संतप्त चर्चा जनतेत आहे.

    रोटरी क्लब नेहमी जनउपयोगी कार्याचा देखावा जनतेसमोर करीत असते. विशेषतः प्लास्टिक मुक्त हिंगणघाट या मोहिमे अंतर्गत रोटरीने एकीकडे कापडी पिशवी वाटण्याचे नाटक केले, तर या उत्सवात सिंगल युज प्लास्टिकची देवाणघेवाण सर्रास सुरु असतांना रोटरीने मात्र मौन बाळगले.नेहमी नगरपरिषद व वृक्षमित्र परिवार यांच्या संयुक्त वतीने राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक निर्मूलन अभियानात रोटरी सक्रिय सहभाग घेऊन जनतेत जागृती करण्याची हौस भागवून घेतात मात्र पाच दिवस चाललेल्या रोटरीच्या आनंद मेळाव्यात या प्लास्टिकचा प्रचंड प्रमाणात उन्मुंक्त संचार सुरु होता. आणि सर्व रोटरीयन मोठ्या मनाने हा सोहळा अनुभवत होते.

ज्या उद्देशाने रोटरी क्लब जनतेत समाजसेवेचा आव आणून पर्यावरण विषयक मोठ्या मोठया कल्पना जनतेच्या गळी उतरविण्याचे नाटक करीत असतात,तोच बुरखा रोटरीच्या उत्सवात टराटर फाडल्या गेला. या सोहळ्यात लागलेल्या प्रत्येक स्टॉल वर प्लस्टिकचा मोठया प्रमाणावर वापर झाल्याचे दिसून येतं होते.

     या संदर्भात वृक्षमित्र परिवार व जिवरक्षक फाउंडेशनच्या सदस्यांनी या रोटरीच्या उत्सवाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता संपूर्ण परिसरात सिंगल युज प्लास्टिकचा खच दिसून आला. याच उत्सवातील प्रत्येक स्टॉलवरून सामानाची देवाणघेवाण ही मोठया प्रमाणावर सिंगल युज प्लस्टिक पिशवीतून होत होती. परंतु रोटरी क्लबच्या वरपासून तर खालपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांला यावेळी पर्यावरणाची हानी होत असल्याचे दिसून आले नाही हे गावाचे दुर्दैव.

    एकीकडे प्लस्टिक बंदीच्या प्रचाराची नौटंकी करणारे हेच का ते रोटरीयन…? असा प्रश्न रोटरीचे यापूर्वीचे प्लास्टिक मुक्त अभियान संदर्भातील सक्रिय भूमिका पाहून अनेकांना पडलेला आहे.

    मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा सरळ सरळ निर्लज्ज प्रकार या रोटरी उत्सवात जनतेला अनुभवायला मिळालेला आहे. प्लास्टिक मुक्तीचा जागर मनाशी बाळगून देखावा करणारे रोटरीचे जबाबदार सदस्य प्रत्यक्षात मात्र त्याविरुद्धचे वर्तन करून खुले आमपणे सिगल युज प्लस्टिकचा वापर करतांना दिसून आले.समाजसेवेचा आव आणून जनतेला मूर्ख समजण्याचा हा प्रयत्न रोटरीने करू नये अशी शहरवासियांची विनंती आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये