ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान

जनजागृतीसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

नगरपंचायत सावली व राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली च्या विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगरपंचायत सावलीचे कनिष्ठ अभियंता प्रणाली दुधबळे उपस्थित होते. युवकांना मतदानाचे महत्त्व सांगून नव मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सिग्नेचर कॅम्पिंग आयोजित करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माझं पहिलं मत देशासाठी अशी शपथ घेऊन स्वाक्षरी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर नगरपंचायतचे समीर सहारे यांनी परिश्रम घेतले. मतदार जनजागृती अभियान अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला अभियान यशस्वीतेसाठी प्रा. स्मिता राऊत, डॉ. रागिनी पाटील, डॉ. किरण बोरकर, प्रा. महानंदा भाकरे यांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये