ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध वाळू वाहतुकीवर भद्रावती पोलीसांची कारवाई

४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             भद्रावती पोलीस स्टेशनच्या पथकाने दिनांक ०२ सेप्टेंबर २०२६ रोजी मांगली ते भद्रावती मार्गावर नाकाबंदी दरम्यान कारवाई करत अवैध वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडला. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ४,५६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

*घटनेचा संक्षिप्त तपशील*

पोलीस स्टेशन भद्रावतीचे डी बी पथक पेट्रोलिंगवर असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, मांगली गावाकडून भद्रावती शहराकडे अवैध चोरीची रेती ट्रॅक्टरमध्ये भरून आणली जात आहे. त्या माहितीवरून पोलीस पथकाने पंचांसमक्ष जमघट ते भद्रावती रोडवर नाकाबंदी केली.

पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास मांगलीकडून येणाऱ्या ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने ट्रॅक्टर न थांबवता भद्रावती शहराच्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून ‘जवळे प्लॉट’ परिसरात ट्रॅक्टर अडवला.

ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव रितीक संतोष रामटेके (वय २६ वर्ष, रा. मांगली, तह. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे सांगितले. त्याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना (रॉयल्टी) नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपी मांगली नाल्यातून अवैधपणे रेतीची चोरी करून ती विक्रीसाठी घेऊन जात होता.

जप्त केलेला मुद्देमाल:

लाल रंगाचा महिंद्रा सरपंच ट्रॅक्टर (विना क्रमांकाचा मुंडा) व लाल रंगाची ट्रॉली (क्र. MH 34 G 6987): किंमत रु. ४,५०,०००/-

ट्रॉलीतील १ ब्रास रेती: किंमत रु. ६,०००/-

एकूण जप्त मुद्देमाल: रु. ४,५६,०००/-

दाखल गुन्हा:

सदर प्रकरणी आरोपी रितीक संतोष रामटेके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक:

सदर कारवाई मा. परी पो.उप अधिक्षक श्री. सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. देवानंद डुकरे (ब.नं. २३०७), पो.हवा. प्रशांत शेंदरे (ब.नं. २४५४), पो.हवा. अनूप आसुटकर (ब.नं. २२९३), पो.हवा. गोपाल आतकुलवार (ब.नं. २५७९), पो.हवा. विजय तलांडे (ब.नं. ८२९) आणि म.पो.अं. मोणाली गारघाटे (अ.नं. ६७१) यांच्या पथकाने केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये