Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिधोरा येथील पंचधारावर युवकांचा धुमाकूळ

पर्यटकांची गर्दी : सुरक्षेअभावी अनुचित घटना घडण्याची शक्यता, सुरक्षितेकडे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिरवा शालू परिधान केलेला निसर्गरम्य वातावरण तसेच धरणातून उसंडणारा धबधबा झुळझुळ वाहणारे नदीतील पाणी पर्यटकांना आकर्षित करण्यात परिसरातील रिधोरा धरण आघाडीवर आहे. सुटीच्या दिवशी येथे मोठी गर्दी उसळते. हे दुश्य पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत असून काही हौशी पर्यटकाकडून सेल्फीसह पोहण्याचा नाद आवरेनासा झाल्याचे दिसते. यापुर्वी सेल्फीच्या नादात अनेकांच्या जिव गेला. असल्याचे दिसून येत आहे. ना सुरक्षा रक्षकाची नेमणूक ना प्रशासन कडून कुठल्याही खबरदारी घेतली नसल्याचे चित्र आहे.

जिल्हात काही दिवसांपासून सततधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नदी नाल्या तुडुंब भरल्यामुळे धरणाची पाणी पातळतही कमालीची वाढ झाली आहे. काही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद पसरला आहे. आनंदाच्या भरात हौशी पर्यटक पंचधारा धरणावर गर्दी करीत आहेत. अनेकांकडून जीव घेण्या पद्धतीने सेल्फी काढण्यात येत आहे. धरण प्रशासनचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. वर्धा नागपुर आदी शहरातून पर्यटक दुचाकी चारचाकी वाहनांनी धरणावर येत आहे. त्याच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. कोरोना पुर्वी दामिनी पंथकाची धरणावर गस्ती असायची. येथील परिस्थितीचे भान विसरून चक्क नि:वस्त्र होऊन तेथे असलेल्या टाक्यावर त्यांनी आंघोळ करणे सुरु केले. याबाबत काही तरुणांनी त्यांनी हटकले असता त्यांनीच त्या युवकांवर दमदाटी सुरु केली. ते धुमाकूळ घालणारे तरुण सतरा ते अठराच्या संख्येने असून पुर्ण दारु पिऊन असल्याचे सांगण्यात आले. आता मात्र पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. पंचधारा धरण सेलू ठाण्याच्या हद्दीत येत असून या सर्व बाबी वर दुर्लक्ष होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये