Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॅनल मध्ये साचलेले पाण्यामुळे शेताला फुटले पाझर ; सरपंच संघटनेचा आंदोलनाचा इशारा

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

साहूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करतो शेती संपूर्ण पाण्याखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने आष्टी तालुक्यात कार नदी प्रकल्प अंतर्गत कॅनल द्वारे पाणी देण्यासाठी पंधरा,सोडा वर्षे आधी कॅनलचे काम केले केलेल्या अर्धवट कामामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. कॅनलला कुठेही लेव्हल काढण्यात आले नाही कॅनल मध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेताला पाझर फुटले असून उभे पीक खराब होत आहे.

आष्टी तालुक्यातील माणिकवाडा,जामगांव,साहूर, वाडेगाव येथील त्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना भेटून तालुका सरपंच संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष अंकित कावडे,प्रवीण ठाकरे,जया प्रशांत कठाणे,अनिल गंजीवाले व सरपंच संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

पंधरा ते सोळा वर्षापासून कॅनलला कुठेही लेवल काढण्यात आली नाही अर्धवट कामामुळे कॅनलच्या भोवताल झाडे झुडपे तयार झालेली आहे. तर कुठे अति पावसामुळे कॅनलचा बांध फुटलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा रस्ताच नाहीसा झालेला आहे. गेल्या काही वर्षात पावसाळा मोठ्या प्रमाणात होत असून कॅनल मध्ये साचलेल्या पाण्यामुळे लगतंच्या शेतकऱ्यांची शेती पाझंरामुळे खराब होत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कार नदी प्रकल्प कारंजा येथे पत्रव्यवहार केला नुकसानाची माहिती वेळोवेळी ऑफिसला दिली दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती दिली परंतु कोणत्याही प्रकारची दखव घेण्यात आली नाही पर्याहि व्यवस्था केली गेली नाही येत्या पंधरा दिवसांमध्ये कॅनल मुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशार तालुका सरपंच संघटना आष्टीच्या वतीने देण्यात आला

कॅनलच्या पाझंरामुळे मागच्यावर्षी संपूर्ण पीक वाया गेले व या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे. वारंवार निवेदन देऊन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही
राजकुमार कांदे
शेतकरी साहूर

मागील वर्षे कॅनल फुटल्यामुळे माझ्या शेतातील संपूर्ण पीकखरडून गेले व कॅनलची दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही
अशोक मोगरे
शेतकरी जामगाव

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये