Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बल्लारपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

तेली समाजाचे आराध्य दैवत संत.श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०० ‘वी’ जयंती रविवार ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने निघालेल्या या मिरवणुकीत शेगाव येथील वारकरी भजन मंडळीनी टाळ मृदंगाच्या स्वर गजराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मिरवणुकी नंतर सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांचे भाषण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शेवटी महाप्रसाद वितरण करून या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शेकडो समाज बांधव भाविकांची उपस्थिती होती.

         दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संत श्री. संताजी जगनाडे महाराजांची जयंती ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित मिरवणुकीत संताजी जगनाडे महाराजांची दिंडी (पालखी), घोडे, देखावे आणि लहान मुलांनी विविध साधू संताच्या वेशभूषा साकारली. शेगाव येथील वारकरी भजन मंडळी मिरवणुकीत आकर्षण ठरली. मिरवणुकीत टाळ मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. मिरवणुकीनंतर संताजी भवन येथे सांस्कृतिक समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध साधू संताच्या वेशभूषा साकारणाऱ्या चिमुकल्या मुलांना पुरस्कार देण्यात आला. २१ वेळ रक्तदान केल्याबद्दल राजू पोटदुखे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे, प्रा. डॉ. रवींद्र हजारे होते. प्रास्ताविक भाषण संत .श्री संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष मंगेश बेले यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विश्वास झाडे यांनी संताजी जगनाडे महाराजांचे सामाजिक एकत्रीकरण, आरोग्य, आणि सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग याविषयी आपले मत मांडले. तर प्रा. डॉ. हजारे यांनी थोर समाजसेवक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा, संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याबद्दल उपस्थित समाजबांधवांना माहिती दिली.

यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा डॉ. भाग्यश्री रागीट (गवते), युवती मंडळाच्या अध्यक्षा मोनाली शेंडे व युवक मंडळाचे अध्यक्ष मोहित ईटनकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन स्वाती बाबूलकर मॅडम, अर्चना बुटले यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर घुबडे यांनी केले. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरण करून झाली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर घुबडे, सचिव राजेश खनके, कोषाध्यक्ष मोहन कळंबे, सहसचिव अनिल ढोक, ज्ञानेश्वर कामडी, अँड. बंडू खनके, जयंत सुरकर, मधूकर शेंडे, चंद्रशेखर लिचोडे, विजय बाबुलकर, राजूभाऊ गवळी, किसनराव लोहबडे, संत. श्री संताजी महिला मंडळ, संत श्री.संताजी युवती मंडळ, संत श्री. संताजी युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये