ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयएएस रंजित यादव यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 संस्कार ज्युनिअर आयएएस स्पर्धा परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांनी रंजित यादव साहेब (आयएएस) तहसीलदार कोरपना यांचेशी तहसील कार्यालयात भेट घेतली, सातवीतिल मुलांशी सरानी शैक्षणिक चर्चा केली. त्यांच्या भविष्याचा वेध जाणून घेतला त्यांचे मार्गदर्शक ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा संयोजक सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांनि भेट घडवुन आणली यात वैष्णवी सुनील बावने,ओवी अजय राठोड,भाग्यश्री विजय तेलंग,प्रतीक बालाजी नरवटे, अंश गणेश तुरानकार ,राजिद राजीबुल इस्लाम रेहान राजुबूल इस्लाम यांचा समावेश होता नुकतेच स्टुडेंट फोरम च्या कार्यक्रमात यादव सरंच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावले होते, त्यांच्या भेटिचा मोह आवरला नाही मुलांनि उच्चपदस्थ अधिकारीशी भेट झाली त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये