ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांग्रेसच्या महिला माजी शहराधक्षाचा भाजपात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदुर – पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांच्या विकासात्मक धोरणाना प्राभावित होऊन भाजप मध्ये इनकमिंगला जोरात सुरूवात झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर दिनांक 21 डिसेंबर रोजी चंद्रपुर येथिल दिनदयाल उपाध्याय वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मत्स्य व्यवसाय, वने,सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपुर जिल्हा पालक मंत्री मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे उपस्थितित गडचांदूर कांग्रेस महिला माजी शहर अधक्षा अर्चना उमेश आंबेकर यानी भाजपात जाहिर प्रवेश केला. भाऊंचा हस्ते दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा जिल्हाधक्ष मा. हरीश भैय्या शर्मा,चंद्रपुर शहर भाजपा अधक्ष मा.राहुल पावडे,माजी जिल्हा परिषद अधक्षा श्रीमती संध्याताई गुरनुले,भाजपा प्रदेश संयोजिका शुभाताई पाध्ये, जिल्हा महिला आघाड़ी महामंत्री विजयालक्ष्मी डोहे इतरांची प्रमुख्याने उपस्थिति होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये