ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिढ्यांपासून वन जमिनीवर वास्तव्य करणाऱ्यांना घरकुल बांधकामाची परवानगी द्या – विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित

चांदा ब्लास्ट

वन जमिनीवर झोपड्या बांधून पिढ्या न पिढ्यांपासून वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना वन हक्क दावा अंतर्गत जमिनीचा पट्टा मिळाला. याची नमुना आठ वर नोंद असतानाही वन प्रशासनामार्फत मंजूर घरकुल बांधकामासाठी अडवणूक होत असल्याने हजारो कुटुंबीयांना घरकुलाच्या लाभापासून वंचित रहावे लागत असून त्यांचे पक्के घराचे स्वप्न अधांतरीच ठरले आहे. यात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आदी जिल्ह्यांचा समावेश होत असून वन विभागामार्फत वन  जमिनी पट्टे धारकांना घरकुल लाभार्थ्यांना घरे बांधण्याची तातडीने परवानगी द्या अशी मागणी विरोधी पक्ष नेते  आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्य सीमेवरील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये वन जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. तर अनेक ठिकाणी गेल्या पिढ्या न पिढ्यापासून विदर्भपातील या जिल्ह्यातील नागरिक झोपड्या बांधून वन जमिनीवर वास्तव करतात. अशा परिस्थितीत त्यांना वनविभागा अंतर्गत जमिनीचे पट्टे तर मिळाले. व नमुना आठ वर नोंदी ही झाल्या मात्र त्यांचा स्वतंत्र सातबारा न झाल्यामुळे मिळालेले पट्टे हे अजूनही लाभार्थ्यांच्या उपयोगी पडताना दिसत नाही. मिळालेल्या या वन जमिनीच्या पट्ट्यांवर जुनी झोपडी हटवून वास्तव्याकरिता पक्के घर बांधण्यासाठी अनेक पट्टे धारकांनी घरकुल योजनेत अर्ज केला. आणि शासन स्तरावरून त्यांना घरकुल योजनेचा लाभ ही मिळाला मात्र या वन हक्क पट्टा जमिनीवर घरकुल मंजूर असतानाही बांधकामा करिता वन प्रशासन अडवणूक करत असल्याने घरकुल लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरत आहे. एकीकडे शासनाकडून वन हक्क पट्टे मिळाले आणि दुसरीकडून मात्र मंजूर असतानाही घरी बांधकाम करण्याकरिता अडवणूक करणे हे शासनाचे दुटप्पी धोरण असून याबाबत वनमंत्र्यांनी चारही जिल्ह्यातील प्रतिनिधींना सोबत घेऊन बैठक लावून सदर समस्या तात्काळ निकाली काढावी. अशी मागणी रेटून धरत विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
     “मरणवाट’ ठरत असलेल्या समृद्धी महामार्गाची वाहतूक थांबवा- विजय वडेट्टीवार
समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाचे मोठे पाऊल असले तरी सध्या सदर महामार्गावर होणाऱ्या विविध अपघातामुळे हा मार्ग “मरणवाट’ ठरत आहे. सदर मार्ग अपघात मुक्त करण्यासाठी 150 किमी प्रति अंतरावर फूड सेंटर, संरक्षण सुविधा, रुग्णवाहिका, ट्रॉमा सेंटर व सुरक्षित बाबतच्या अन्य सुविधा उभारणीपर्यंत सदर मार्ग हा तात्पुरता बंद करण्यात यावा. जेणेकरून नागरिकांचा अपघाती मृत्यू पासून बचाव होईल. अशी मागणी विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये