चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

नागभीड नगर-परिषदेमध्ये करोडोंची अफरातफर, लेखा परीक्षण अहवालात ताशेरे

लेखा परीक्षण अहवालात करोडोंची अफरातफर किंबहुना भ्रष्टाचार आला उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

मा. प्राजक्त तनपुरे, नगर विकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना नागभीड येथील विश्राम गृहात, शिवसेना नागभीड तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले, त्यामध्ये नागभीड नगर परिषदेच्या लेखापरीक्षण अहवालातील करोडोंची अफरातफर किंबहुना भ्रष्टाचार, नगर विकास राज्यमंत्रांच्या लक्षात आणून देण्यात आले आणि येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर लक्षवेधी घेऊन दोषींवर लवकरात लवकर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सोबतच
१)नागभीड नगर परिषद ही कायमच प्रभारीच्या भरवश्यावर सोडण्यात आली असून लवकरात लवकर नागभीड नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देऊन सत्ताधारी पक्षाच्या बेबंदशाहीला लगाम घालण्यात यावे.
२)सर्व शासकीय कार्यालयात लवकरात लवकर स्थायी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.
३) शिवनगर(नागभीड), नवखळा, बाम्हनी, खैरी चक येथील झोपडपट्टी वासीयांना कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे.
४) आदिवासींना शबरी महामंडळाकडून घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.
५) शेत पंपाची वीज जोडणी त्वरित करून देण्यात यावी तसेच शेती आणि घरगुती वीज बिलाचे अतिरिक्त शुल्क कमी करण्यात यावे.
६) ब्रम्हपुरी रोडवरील, पंचायत समितीच्या जवळील प्रस्तावित देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात येऊ नये.
इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी, भोजराज ज्ञानबोनवार शिवसेना तालुका प्रमुख, श्रीकांत पिसे शहर प्रमुख, मनोज लडके उप तालुका प्रमुख, नंदू खापर्डे, ईश्वर नागरीकर उप शहर प्रमुख, राजा साबरी उप विभाग प्रमुख, बालू चिलमवार, प्रशिल निमगडे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button