ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व जाणणे अत्यावश्यक!

चांदा ब्लास्ट

विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व जाणून घेत असतांनाच ग्राहक कायदा व त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध बाबी सुद्धा माहिती करून घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नंदिनी प्रकाश चुनारकर अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेंडकी येथील कार्यक्रमात केले. पुढे त्यांनी शालेय अभ्यासक्रमात असलेला ग्राहक कायदा संबंधित बाबींचा यावेळी आपल्या भाषणात उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून संगिता लोखंडे अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर तथा महिला प्रमुख अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजना मागची भूमिका विशद करून शासनस्तरावर होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कल्पना कुटे पूर्व सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर यांनी मार्गदर्शन करतांना विविध स्तरांवरील कार्यरत ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या कामकाजाबाबत माहिती देऊन आपले हक्क जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक भुरले मुख्याध्यापक महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रमुख पाहुणे बी.के.भैसारे मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, हरिदास तलमले उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंडकी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन करून अखिल भारतीय ग्राहक पंचायत करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रामप्रकाश देशकर सहायक शिक्षक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामप्रकाश देशकर ,जिब्राईल खान पठाण,कुमोद चौधरी,शरद सोनूले, मेघराज आंबोरकर आदी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी व ग्राहक दिनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी शाळा स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक प्रज्वल आंबोरकर, द्वितीय क्रमांक ऋतुजा निशाने, तृतीय क्रमांक स्नेहा दडमल त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक रैदखान पठाण, मनस्वी राऊत द्वितीय क्रमांक अंजली टेंभूर्णे,काजल म्हशाखेत्री, तृतीय क्रमांक प्रियांशु गुरनुले, स्नेहल गेडाम यांनी पटकाविला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे कार्यक्रमाचे विशेष.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये