ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य

आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला स्वतंत्र इमारत नसून याठिकाणी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगारांची अनेक पदे रिक्त असल्याचे, तसेच खाटा नसल्याने रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागत असल्यासंदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली.

चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला स्वतंत्र इमारत नाही. मात्र, याठिकाणी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगारांची अनेक पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने या पदांची पदोन्नती व सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

रुग्णालयातील एक्स-रे यंत्र बंद असल्याचे आणि औषधसाठा नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असल्याचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. मुश्रीफ म्हणाले की, रुग्णालयातील एक्स-रे यंत्र कार्यरत असून औषधसाठाही पुरेसा आहे.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील असुविधांचा आढावा घेऊन आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून कार्यवाही सुरू आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये