ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प. टेकामांडवा शाळेची शैक्षणिक सहल नागपूर परिसरात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा येथील शाळेची एक दिवसीय शैक्षणिक सहल नागपूर परिसरात शैक्षणिक व ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन आली.

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व शैक्षणिक ठिकाणांची माहिती व्हावी परिसरातील विविध घडामोडींबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने जीवती अंतर्गत जि प टेकामांडवा या शाळेची शैक्षणिक सहल चंद्रपूर येथील महाकाली मंदिर, भद्रावती येथील विजासन लेणी, श्रद्धेय बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेल्या आनंदवन व तेथील मुक्तांगण, दिव्यांग बांधवांचा असलेला आर्केस्ट्रा,विणकाम,हातमाग तसेच नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र ,महाराज बाग, झिरो माइल, दीक्षाभूमी, मॉल व मेट्रो प्रवास इत्यादी ठिकाणांना भेट देऊन सुरक्षित टेकामांडवा येथे परत आली. यावेळी या सहलीत एल एम पवार, किसन बावणे, दीपक गोतावळे,मुखळा मलेलवार व ४४ विद्यार्थी सहभागी झाले होते.

ही शैक्षणिक सहल संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजिवाड, गटशिक्षणाधिकारी सुनील झोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालक वृंद,सहकारी रुपेश मांदाळे, उषा डोये यांचे सहकार्यामुळे यशस्वीरित्या पूर्ण केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये