ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शालेय विद्यार्थांची आरोग्य तपासणी

चांदा ब्लास्ट 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शालेय विद्यार्थांची आरोग्य तपासणी उपक्रम सुरु करण्यात आला असून सदर उपक्रमाअंतर्गत किदवाई हायस्कुल आणि अष्टभुजा वार्डातील सावित्रीबाई प्राथमीक शाळेत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास अडीच हजार  विद्यार्थी व पालकांची  आरोग्य तपासणी करण्यात आली.

    यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध भागात महापालीकेच्या मार्फत भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर शिबिरात लहाण बालकांची संख्या अपेक्षीत अशी नव्हती. शाळांना सुट्टी नसल्याने अनेक विद्यार्थी सदर शिबिरात पोहचु शकले नव्हते सदर बाब लक्षात येताच गरीब गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता.

       दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर शिबिरे आयोजित केल्या जात आहे. दोन शाळांमध्ये हे शिबिरे संपन्न झाली असून या शिबिरांमध्ये 1 हजार 500 विद्यार्थी आणी 1 हजार विद्यार्थांच्या पालकांची निशुल्क तपासणी करण्यात आली आहे. यावेळी औषध उपचार करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये डॉ. पालीवाल, शासकिय वैद्यकिय रुग्णालयाचे डाॅ. रामेश्वर बारसागडे, अस्थीरोग तज्ञ डाॅ. उल्हास बोरकर, कान, नाक घसा तज्ञ डाॅ. सचिन बिलवने, नेत्र शल्य चिकित्सक डाॅ ईश्वर मेश्राम, दंत शल्य चिकित्सक डाॅ. आकाश कासटवार, औषध तंज्ञ डाॅ. प्रसाद पोटदुखे, बालरोग तंज्ञ वरुणा जगताप, स्त्रीरोग तज्ञ गेश्री कोरडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सफल कोटनाके, औषध निर्माता संकेत जगताप यांच्यासह चंद्रपूर महानगर पालिकेच्या आरोग्य पथकाची उपस्थिती होती.

   सदर उपक्रम असाच सुरु राहणार असुन मतदार संघातील शाळांमध्ये हे शिबिरे आयोजित केल्या जाणार आहे. या शिबिरांमध्ये गंभीर आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर पुढील उपचारही यंग चांदा ब्रिगेडच्या मार्फत केल्या जाणार आहे. सदर शिबिरामध्ये सर्व विभागाचे तंज्ञ डाॅ उपस्थित राहणार असून शहरातील खाजगी डाॅक्टरांचे या शिबिरांना सहकार्य असणार आहे. किदवाई आणि सावित्रीबाई शाळेत पार पडलेल्या शिबिराला शिक्षक वृध्द पालकवर्ग व स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये