ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिनगाव येथे 7 एप्रिल पासून उदासी देविदास महाराज यांचा १५६ वा प्रगटदिन सोहळा  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे मागील वर्षीपासून सुरू केलेल्या उदासी देविदास महाराज यांचा प्रगट दीन उत्सव सोहळ्यास यात्रौत्सवाची सुरुवात करण्यात आल्याने भक्तात चैतन्य मय वातावरण निर्माण झाले आहे.

 १८६० च्या दशकात एक महान योगी उदासीन पंथाचे संत उदासी देविदास महाराज जाफराबाद प्रगणे असलेल्या सिनगाव जहागीर येथे आले,गावठाण असलेल्या काळू बंगाळे यांच्या पांढरीतील शेतात माती धाब्यात स्थानापन्न झाले. दिवसेंदिवस ग्रामस्थांना त्या थोर संतांची जाणीव होऊ लागली तब्बल ६७ वर्ष गावाशी नाळ जुळलेली असतांना ठराविक ग्रामस्थ संपर्कात राहिल्याने त्यांच्या शिकउनिकीचा वसा पुढे नेता आला नाही आणि शुद्ध अश्विन दशमी १९२७रोजी संजीवन समाधी घेऊन गावा सह भूतलावाचा निरोप घेतला.

  संत शेगाव चे गजानन महाराज, शिर्डीचे साईनाथ, आणि सिनगाव चे उदासी देविदास महाराज, हे समकालीन संत होऊन गेले शेगाव आणि शिर्डी च्या तुलनेत सिनगाव हे संतांच्या रथाचे सारथी कमी पडल्याने सिनगाव हे शून्य निर्माण करण्याचे टोक सुद्धा नव्हते रिद्धीसिद्धी प्राप्त संत उदासी देविदास महाराज यांना निर्वंतून ९५वर्षे २०२२ मध्ये झाली होती. मात्र महाराज यांचा प्रगटदिन सोहळा हा उत्सव म्हणून कधीच साजरा झाला नव्हता यात तत्कालीन ग्रामस्थांचे दुर्दैव म्हणावे लागेल हा उत्सव पूर्वतयारी म्हणून प्रथमतः २०२३ ला गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्सव समितीने हा उत्सव साजरा व्हावा या उद्देशाने एकत्र येऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पाडला.

आता याही वर्षी२०२४चा सात ते दहा एप्रिल या चार दिवसाच्या यात्रौत्सवात ९एप्रिल या दिवशी गुढीपाडवा आणि श्रीसंत उदासी देविदास महाराज यांचा प्रगटदिन सोहळा निमित्त समाधीस्थळ पासून नवीन गावठाण मंदिरापर्यंत पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात अनेक दिंड्याच्या साक्षीने हा सोहळा पार पडणार आहे. सात तारखेस सुनीता ताई आंधळे आळंदी देवाची यांचे कीर्तन, आठ तारखेस आवाजाचा बादशाह असणारे पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे कीर्तन, तर नऊ तारखेस दुपारी बारा वाजता पांडुरंग महाराज उगले परभणी यांचे कीर्तन, सायंकाळी पुणे येथील मनोरंजन ऑर्केस्ट्रा,दहा तारखेस देवीचे नगर प्रदक्षिणा आणि उत्सवाची सांगता येड्या नवरदेवाची लग्नाने होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये