भाजपच ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी संवेदनशील असल्याने घेणार पक्षप्रवेश – डॉ. अशोक जिवतोडे
ओबीसी नेते शिक्षण सम्राट डॉ. अशोक जिवतोडेंचा भाजपा प्रवेशाचा मुहुर्त ठरला - चांदा ब्लास्टच्या बातमीवर शिक्कामोर्तब
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
जेष्ठ ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक, शिक्षण सम्राट प्राचार्य अशोक जिवतोडे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून हातातील घड्याळ काढण्याचे निश्चित केले असुन ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी भाजपा अधिक संवेदनशील असल्याने तसेच देशाची प्रतिष्ठा, विकास व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यात भाजपच सक्षम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण भाजपा मधे प्रवेश करत असल्याचे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे ह्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
डॉ. जिवतोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते असुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक देखिल आहेत. त्यांनी ओबीसी बांधवांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली असुन समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी संघर्ष केला आहे. ओबीसी जनगणना व्हावी ह्या मागणीसाठी त्यांनी राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून टाकले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे बऱ्याच राजकीय पक्षांनी ओबीसी जनगणनेला पाठिंबा देखिल दिला असुन त्यांचे हे आंदोलन देशव्यापी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
आपण राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असुन ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्याची इच्छाशक्ती तसेच त्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता केवळ भाजपा मधे असल्याने आपण देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नेतृत्वात भाजप प्रवेश करत असुन पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
डॉ. अशोक जिवतोडे ह्यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार बंटी भांगडिया, माजी मंत्री शोभाताई फडणविस, आमदार परिणय फुके, आ. संजीव बोदकुलवार, माजी आ. अतुल देशकर, माजी आ. सुदर्शन निमकर, माजी आ. संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे तथा भारतीय जनता पक्षातील समस्त आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
चांदा ब्लास्टच्या बातमीवर शिक्कामोर्तब
काल दिनांक 20 जुन रोजी चांदा ब्लास्ट ने डॉ. अशोक जिवतोडे भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणार असुन 25 जुन रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिमाखदार सोहळ्यात डॉ. अशोक जिवतोडे ह्यांचे पक्षात स्वागत करणार आहे. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर अथवा जनता महाविद्यालयाच्या पटांगणात होणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
https://chandablast.com/?p=3615
चांदा ब्लास्ट ने वृत्त प्रकाशित केल्याचा दुसऱ्याच दिवशी डॉ. अशोक जिवतोडे ह्यांनी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत 25 जुन रोजी दुपारी 3:30 वाजता जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करून चांदा ब्लास्टच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे.