ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने रु. ८३ लाख ९३ हजार पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे टिनाचे शेड मंजुर

ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले

चांदा ब्लास्ट

महाराष्‍ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे प्रधान डाकघरपाण्‍याची टाकी स्‍टॅंड व मुख्‍य बस स्‍टॅंड ऑटो‍रिक्षा स्‍टॅंडवर ऑटो उभे करण्‍याकरिता स्‍थायी स्‍वरुपाचे स्‍टॅंड ऑटोरिक्षा चालकांना उपलब्‍ध करुन देण्‍यात यावेअशी मागणी मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍याकडे पत्रव्‍यवहार करुन करण्‍यात आली.

त्‍यामुळे मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्‍त यांना सुचना करुन पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे त्‍वरित टिनाचे शेड उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे असे निर्देश दिले.  त्‍यामुळे नगरोत्‍थान निधी अंतर्गत रु. ८३ लाख ९३ हजार निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. 

त्‍याबद्दल महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकरजिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊतजिल्‍हा सचिव सुनिल धंदरेजिल्‍हा संघटन प्रमुख विनोद चन्‍नेकुंदन रायपुरेदिलीप ढवळेपरशुराम तुराडेअंकुश  कौरातेकिशोर वाटेकरवासुदेव कुबडेमहेश ढेकरेजनार्धन गुंजेकरअरविंद चौरेराकेश पवारबबन टोंगेअविनाश उकेकररमेश वझेबंडू भगत तसेच चंद्रपूर शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये