ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा लालगुडा येथे “पुस्तक वाचन” उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटने बरोबरच अस्पृश्यता निर्मूलन कार्य व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची बहुमूल्य कार्य आपल्या बहुमूल्य आयुष्यात केले त्यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा केंद्र गडचांदूर ता. कोरपना येथे विद्यार्थ्यांसाठी “पुस्तक वाचन” उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना गटा -गटा मध्ये बसवून बाल वाचनालयामधील पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली होती.

     या उपक्रमाचा उद्देश हाच होता की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये वाचनाचे, पुस्तकाचे महत्व सांगितले आहे. पुस्तके आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत याबाबत त्यांनी लोकांना संदेश दिलेला आहे. हा वाचन संस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांवर व्हावा, त्याचबरोबर त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये