ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चकविरखल येथे सावली तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 पंचायत समिती शिक्षण विभाग सावलीच्या वतीने ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणीक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन श्रीमती इंदिरा गांधी विदयालय चक विरखल येथे दिनांक ०४ डीसेबर ते ०६ डीसेबंर २०२३ला करण्यात आले होते.या प्रदर्शनीला उदघाटक म्हणून पंचायत समीती सावलीच्या गटशिक्षणाधीकारी संध्या कोनपत्तीवार,अध्यक्ष म्हणून ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ नीमगावचे अध्यक्ष कवडू खोब्रागडे,प्रमूख अतिथी सरंपच मुक्तेश्वर अभारे,विरखल चकचे पोलीस पाटील आनंदराव गंडाटे, दाबगाव मौशी चे पोलीस पाटील सुरेश गेडाम, माजी जि.प.सदस्य पांडूरगं तागंडे,सावली मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य परशुराम समर्थ, प्राचार्य विलास लोखंडे, प्राचार्य कल्पना गराटे, मुख्याध्यापक किरण खोब्रागडे, रवींद्र कुडकावार, सुभाष गीरडकर, तोडे, पुरुषोतम निकूरे, गाढवे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक किशोर चन्नावार, मडावी, केद्रंप्रमूख जीवन भोयर, धनराज सुरपाम, राजू रक्षमवार, आकरे प्रामूख्याने उपस्थीत होते.

 प्रदर्शनीचा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणी तंत्रज्ञान हा होता.प्रदर्शनी उच्च प्राथमिक गट वर्ग ६ ते ८, माध्य मिक व उच्च माध्यमीक गट वर्ग ९ते १२,प्राथमीक,माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा परीचर/सहायक या गटात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उच्च प्राथमिक गटात ४१, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात २०, प्राथमिक शिक्षक ०२, माध्यमिक शिक्षक ०२, प्रयोगशाळा परीचर ०२ यांनी सहभाग घेतला होता.उच्च प्राथमिक (गैरआदिवासी) गटातून प्रथम जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा सायखेडा, व्दितीय जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा पाथरी, तृतीय रमाबाई आंबेडकर विदयालय सावली, उच्च प्राथमिक गट (आदीवासी) प्रथम जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा मुंडाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आदीवासी) प्रथम संत गजानन महाराज हायस्कूल पेढंरी मक्ता,माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (गैर आदीवासी) प्रथम मांउट ज्युनीअर सांयस कॉलेज सावली, व्दितीय शरदचंद्र पवार विदयालय व्यहाड खूर्द,तृतीय रमाबाई आंबेडकर विदयालय सावली, प्राथमीक शिक्षक गटातून प्रथम जी.प. उ.प्रा.शाळा पाथरीचे योगेश पवार, माध्यमीक गटातून *प्रथम* विकास विदयालयाचे सूनील चावरे, प्रयोगशाळा परीचर गटातून प्रथम श्रीमती इंदीरा गांधी विदयालयाचे गजेद्रकुमार गेडाम याची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली. तसेच विदयार्थ्याकरीता वक्तृर्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ नीमगाव चे सचीव फाल्गून खोब्रागडे, बक्षीस वितरक म्हणून गटशीक्षणाधीकारी संध्या कोनपत्तीवार, प्रमूख अतीथी केंद्रप्रमूख जीवन भोयर आकरे, बोरेवार, दिपक राउत, मुख्याध्यापक रवींद्र कूडकावार, मुख्याध्यापक अजय कोंडेकर ,मुख्याध्यापक चंद्रशेखर पीदूरकर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे उदघाटन व समारोप कार्यक्रमाचे सुत्र संचालन मार्खड साखरे तर आभार आयोजक चंद्रशेखर पीदूरकर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये