कोरपना तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर
15 तारखेला धडकणार नागपुरात मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती कोरपण्याच्या वतीने विविध मागण्या घेत कोरपना तहसील कार्यालयच्या समोर कोरपना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत पाठवण्यात आले, दुष्काळग्रस्त तालुक्यात असलेल्या अंगणवाडीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे प्रश्न सोडावेत यासाठी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्यात निवेदन दिले होते.
परंतु त्यांच्या मागण्या कोणत्याही निर्णय न झाल्याने परत 4 डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी त्यांनी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले ,या निवेदनामध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आपिल मधील 25 एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतन श्रेणी ग्रॅच्युईटी भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात यावेत,तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधन वाढ जाहीर करावी मदतनीस व सेविकाचे मानधन किमान 18 ते 26 हजारापर्यंत करावे मानधन महागाई निर्देशकाला जोडून तर सहा महिनेन्यानी त्यात निर्देशकानुसार वाढ करावी अंगणवाडीसाठी किमान रुपये 5000 ते 8000 भाडे मंजूर करावे आहाराचा 8 रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकासाठी सोडा व अति कृषी बालकासाठी 24 रुपये असा करावा या मागण्या पूर्ण न केल्यास दिनांक 15 नोव्हेंबर पासून नागपूर येथे करणार असल्याची माहिती गुजाबाई डोंगे, विमल जेनेकर,शोभा काकडे, कल्पना मोडक, प्रतिभा निब्रड, मंजुषा मालेकर ,हेमलता जुमनाके,अर्चना काकडे, संगीता ठोंगे, वंदना, मेगा लिपटे, प्रतिज्ञा टाले, पालीवार, तसेच सर्व कोरपना तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असल्याचे सांगितले तसेच आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.